आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, MNS, Social Media, Divya Marathi

राज यांच्या नावे खोटे फेसबुक खाते; मनसेचे पोलिसांना पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने फेसबुक, ट्विटरवरील बनावट अकाउंटवर कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून केली. यावर अद्याप पोलिसांनी कारवाई केली नाही, असे मनसे मीडिया संयोजक सचिन मोरे म्हणाले. मोरे यांनी सांगितले की, सोशल नेटवर्किंग साइटवर मनसे अध्यक्षांच्या नावाने बनावट खाते उघडणारी व्यक्ती स्वत: राज ठाकरे असल्याचा भ्रम तयार करत आहे.

ही व्यक्ती आक्षेपार्ह टि्वटसह फेसबुक व टि्वटवर वादग्रस्त पोस्टही टाकत आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीला तत्काळ अटक करून बनावट खाती बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. या आधी २०१२ मध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांच्या नावानेही सोशल नेटवर्किंग साइटवर खोटी खाती उघडण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी तत्काळ ती खाती बंद पाडली होती.