मुंबई- टोल वसूलीला विरोध करण्यासाठी आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरे स्वतः वाशी टोल नाक्यावर आंदोलनाचे नेतृत्व करणार होते. परंतु, त्यापूर्वीच चेंबुरच्या आरसीएफ पोलिसांनी त्यांना अटक केली. राज ठाकरेंना झालेली ही अटक पहिल्यांदाच झालेली नसून यापूर्वी रत्नागिरी ग्रामिण आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांना अटक केली होती. उत्तर भारतीयांच्या छटपूजेबाबत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती.
उत्तर भारतीयांच्या छटपूजेसंदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे झारखंडच्या एका वकिलाने जमशेदपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिल्यामुळे राज यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. त्यानंतर हे वॉरंट मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.
मात्र, 'मला अटक करून दाखवा' असे सरकारला आव्हान देणाऱ्या राज ठाकरे यांना लगेच अटक केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे 20 ऑक्टोबर 2008 च्या मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रत्नागिरीच्या सरकारी विश्रामगृहातून त्यांना अटक करण्यात आली होती.
उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने झाली होती अटक, वाचा पुढील स्लाईडवर