आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Mumbai, Maharashtra

मनसेप्रमुख राज ठाकरेंचे मानसिक संतुलन ढासळले, हाजी शेख यांचा अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राजठाकरेंचे मानसिक संतुलन ढळले असून त्यांना आराम करण्याची गरज अाहे,’ असे खळबळजनक वक्तव्य करत मनसेचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मनसेला रामराम ठाेकला. गेली २० वर्षे सोबत केल्यानंतरही आपल्याला राज यांनी नीट वागणूक दिली नसल्यानेच आपण पक्ष सोडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या हाजी अराफत शेख यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत आपल्या हजारो समर्थकांसह मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंबईतल्या कुर्ला येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शेख म्हणाले की, मनसेमध्ये मुस्लिम समाजाला न्याय मिळत नसल्याने आपण पक्ष सोडत असून राज ठाकरेंभोवती काही मोजक्याच नेत्यांचे कोंडाळे तयार झाल्याचे सांगत शेख यांनी राज यांच्यावर सेटलमेंटचेही अाराेप केले. भविष्यात आपण आपल्या समाजाची मजबूत संघटना बांधणार असून इतर कोणत्या पक्षात जाणार किंवा नाही याबाबत अजून काहीच ठरवले नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शेख हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे कळते.
>पक्षाच्या आमदारांना भेटावयास बोलावून राज आपल्या दोन श्वानांशी तासंतास खेळत बसतात.

>जे स्वत:चे भविष्य सावरू शकत नाहीत ते महाराष्ट्राचे भवितव्य काय ठीक करणार, अशी बोचरी टीका हाजी अराफत यांनी राज ठाकरेंवर केली.

>बाळासाहेबांसारखा आवाज काढून आणि अमिताभ बच्चनची नक्कल करून कोणी मोठा नेता होत नाही

>मनसेची ब्ल्यूप्रिंट बकवास असून त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेला काहीच मिळणार नाही. दुष्काळामुळे हवालदिल झालेला शेतकरी दोन दोन तास तुमची ब्ल्यूप्रिंट पाहणार आहे का?
सध्या राज ठाकरेंच्या जेम्स आणि बाँड यांची पक्षात चलती आहे. कामगार नेते मनोज चव्हाण हे जेम्स असून आमदार नितीन सरदेसाई हे बाँड आहेत. हे दोघे पैशांची सेटलमेंट करत असल्याचा आरोपही शेख यांनी केला. ताज या पंचतारांकित हॉटेलमधून ७० मराठी मुलांना कामावरून कमी केल्याच्या विरोधात मी काही वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. त्या वेळी मला राज ठाकरेंच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांचा फोन आला होता. ते आंदोलन ताबडतोब स्थगित करा, असा निरोप अभ्यंकर यांनी मला दिला. मराठी मुलांसाठी जर मी लढत होतो तर मग मला आंदोलन स्थगित करायला सांगून राज ठाकरेंनी मराठी माणसांचे कोणते हित साधले, असा सवाल हाजी शेख यांनी केला.