आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- काँग्रेसने 2009 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचा पुरेपूर उपयोग करून घेत आघाडीची सत्ता कायम राखण्यात मोठे यश मिळवले होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच अशोक चव्हाण यांनी मनसेच्या मागे आर्थिक पाठबळ उभे करून शिवसेना व भाजपकडे जाणारी मते रोखण्यात यश मिळवले होते. पाच वर्षांनंतर काँग्रेसचा हाच प्रयोग आता राष्ट्रवादी काँग्रेस करत असून मनसेचे टोल आंदोलन हे त्याचे उदाहरण असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवले आहे.
मागील लोकसभेत राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांना चार ते पाच जागांवर फटका बसणार असल्याचा निवडणूकपूर्व अंदाज आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी मनसेला मोठे करून महायुतीकडे वाहणारे वारे आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
टोल दर निम्म्याने घटवण्याचीही शक्यता
जनतेच्या मनात टोलविरोधी भयंकर संताप असून निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, याचा अंदाज आता कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना आला आहे. हा जनक्षोभ कमी करण्यासाठी निवडणुकीच्या आधी टोलचे दर निम्म्याने कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. काही दिवसांपूर्वीच महायुतीने सत्तेवर आल्यास टोलमुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या धास्तीने आघाडीने हे दर कमी केले असे वातावरण निर्माण होऊ नये म्हणूनही सत्ताधारी आघाडी मनसेच्या आंदोलनाला ‘पाठबळ’ देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अटक झाल्यास लोकप्रियतेत होणार वाढ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.