आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेही तीन दिवसांच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केलेल्या घोषणेनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारपासून गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. यात मराठवाडा, खान्देश व विदर्भातील गावांचा समावेश आहे.

राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून यात पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. मराठवाड्याला गारपिटीचा मोठा फटका बसला असून हातचे पिक गेल्याने अस्वस्थ झालेल्या काही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे मंगळवारपासून मराठवाड्यात या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. या तीन दिवसांत ते औरंगाबाद, बीड आणि जालना या भागातील नुकसानग्रस्त भागाला भेटी देणार आहेत. प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, कन्नड या भागात राज ठाकरे फिरणार आहेत.