आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"विक्रांत\"साठी राज ठाकरे सरसावले, दादरला हेरिटेजचा दर्जा देण्यापेक्षा \"विक्रांत\"ला वाचवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध दादर या भागाला हेरिटेजचा दर्जा देण्यापेक्षा विक्रांत हे विमानवाहू जहाज वाचविण्यावर सरकारने भर द्यायला हवा, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की शिवाजी पार्कला हेरिटेजचा दर्जा देण्याला माझा विरोध आहे. हा प्रस्ताव म्हणजे केवळ मुर्खपणा आहे. बिल्डर लॉबीला लाभ मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. दादरसारख्या सुंदर भागाला हेरिटेजचा दर्जा देण्याची काही गरज नाही. हेरिटेजमध्ये सत्ताधाऱ्यांच्या इमारती ए-वन आणि ए-टू मध्ये दाखविण्यात आल्या आहेत. यावरून यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचे दिसून येते.
हेरिटेजचा दर्जा मिळाल्यावर दादरमधील इमारती, फ्लॅट महाग होतील. याचा फायदा काही मुठभर लोक उचलतील. असे करण्यापेक्षा विक्रांतला वाचविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे.
विक्रांतला मिळाले आहेत दोन महावीरचक्र आणि बारा वीरचक्र, वाचा पुढील स्लाईडवर