आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मोर्चानंतर मनसे खाेलणार ‘राज’, मराठा अारक्षणाबाबत भूमिका गुलदस्त्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यभरलाखाेंच्या संख्येने निघत असलेल्या मराठा समाजाच्या मूकमाेर्चांची अाता मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही दखल घेतली अाहे. मुंबईत अतिविराट माेर्चा काढून या अांदाेलनाची सांगता हाेणार अाहे. त्यामुळे मुंबईतील मोर्चानंतरच राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याशिवाय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मनसेच्या सर्व शाखांना व्यक्तिश: भेटी देणार असून गटाध्यक्षांशीही चर्चा करणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी रविवारी मनसेचे प्रमुख नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील एमआयजी क्लब येथे घेतली. सकाळी अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीला सर्व नेते, सरचिटणीस आणि विभागीध्यक्ष उपस्थित होते.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले. मराठा माेर्चाबाबत पत्रकारांनी विचारले असता नांदगावकर म्हणाले की, ‘अॅट्रॉसिटी कायद्याबाबत कोपर्डी येथे सर्वात आधी राज ठाकरेंंनी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता सर्व नेते त्याबाबत आपली भूमिका मांडू लागले अाहेत.’ मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मनसेची अधिकृत भूमिका काय? या प्रश्नावर नांदगावकर म्हणाले की, ‘मुंबईच्या मोर्चानंतर स्वत: राज ठाकरे त्याबाबतची मनसेची भूमिका जाहीर करतील.’

पाकिस्तानींना विराेध करणाऱ्यांचे अभिनंदन : खोपकर
उरीयेथे अतिरेकी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. या घटनेनंतर मुंबई आणि महाराष्ट्रात एकाही पाकिस्तानी कलाकाराला काम करू देण्याची भूमिका मनसेने मांडली आहे. यानंतर अनेक निर्मात्यांनी आणि वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे काम बंद केले आहे. ‘ज्यांनी हे काम बंद केले त्यांचे अभिनंदन करतो,’ असे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.
राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानी कलाकारांविराेधात जाेरदार निदर्शने केली.
बातम्या आणखी आहेत...