आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलयुद्ध : मनसे आमदार प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरेंसह कार्यकर्त्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) आमदार प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे, संजय घाडी यांच्यासह 35 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टोलविरोधी आंदोलन सुरु झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी रात्री टोलनाक्यांची तोडफोड आणि काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
मुंबईत दहिसर टोलनाक्यावर मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात आज (सोमवार) मोर्चा काढण्यात आला. आमदार दरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईकडे येणा-या मार्गावरील बहुतेक टोलनाके रविवारी रात्री फोडण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर टोलनाका बंद करण्यात आला आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे सोमवारी सकाळी एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी टोल विरोधी आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या आवाहनानंतर रा्ज्यभरात टोल नाक्यांची तोडफोड सुरु झाली आहे. वाशी येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी, जोपर्यंत टोल का घेतला जातो याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही, असे आवाहान केले. राष्ट्रवादी काँग्रेसने टोलविरोधी आंदोलनावर टीका केली आहे. ठाकरे नेहमी झटपट प्रसिद्धीचा मार्ग निवडतात असे तारिक अन्वर यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, 'राज ठाकरेंना झटपट प्रसिद्धी हवी'
खालापूर टोल आंदोलन