आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RAJ Thackeray Presents At Nilanga Session Court After Issuing Warrant

राज ठाकरेंची दुष्काळी दौऱ्यासोबत निलंगा कोर्टातही हजेरी, ठोठावला 2 हजारांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर तालुक्यातील जळकोट, आलियाबाद, जळकोटवाडी, मुरटा, येडूळा, मानमोडी या दुष्काळी भागाची पाहणी करताना राज ठाकरे... - Divya Marathi
तुळजापूर तालुक्यातील जळकोट, आलियाबाद, जळकोटवाडी, मुरटा, येडूळा, मानमोडी या दुष्काळी भागाची पाहणी करताना राज ठाकरे...
लातूर - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुधवारी निलंगा येथील तिसरे सहदिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अटक वॉरंट रद्द करण्यासाठी दोन गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन हजारांचा दंड आकारून त्यांचा १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मराठी माणसांच्या प्रश्नावर ठाकरेंनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मनसेप्रमुख ठाकरे यांना मुंबईत अटक केली होती. त्यानंतर निलंग्यामध्ये तत्कालीन मनसेचे जिल्हा संघटक अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. त्या वेळी एसटीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली होती. यात एक महिला गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र परिवहन मंडळाने निलंगा पोलिस ठाण्यात राज ठाकरे आणि अभय साळुंके यांच्यावरविरुद्ध तक्रार दिल्याने त्यांच्यावर निलंगा पोलिस ठाण्यात ३१ मार्च २००८ रोजी १४३, १४७, ३३६,३५३, ४२७ कलमांनुसार कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याच्या गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून ठाकरे हे वारंवार न्यायालयात गैरहजर राहत होते. समन्स बजावूनही ते उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट बजावण्यात आले होते. ठाकरे यांचे वकील अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ते म्हणाले, निलंगा येथे गुन्हा घडला त्यावेळी ठाकरे हे मुंबईतील खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे निलंगा येथील गुन्ह्यात त्यांचा संबंध नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राज ठाकरेंनी गिरवला मंत्र्यांचा कित्ता..
तसेच राज ठाकरेंच्या दौ-याचे वेळापत्रक...