आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Thackeray Press Confernece On Toll Issue Meeting With Cm

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल भरू नका- राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टोलचे नवे धोरण सादर करू व आम्ही केलेल्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या 21 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर काढण्यात येणारा मोर्चा आमच्या पक्षाने पुढे ढकलला आहे. मात्र राज्य सरकार जोपर्यंत टोल धोरण जाहीर करीत नाही तोपर्यंत टोल न भरण्याचे आमचे आंदोलन सुरुच राहील. राज्यातील लोकांनीही तोपर्यंत टोल भरू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
जर कोणी जबरदस्तीने टोल वसुली करीत असेल तर त्या कंत्राटदाराच्या घरी जाऊन धूमाकुळ घालू, असा इशाराही राज यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील चर्चेवर समाधानी आहोत. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली होती. त्या भेटीत काय-काय चर्चा झाली व त्याबाबत आपले काय म्हणणे यासाठी राज यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
राज म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांसह, छगन भुजबळ, काही सरकारी अधिकारी यांची माध्यमातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री चव्हाण या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून वाटत होते. त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचे नवे टोल धोरण जाहीर करू असे सर्वांसमोर आश्वासन दिले आहे. यापूर्वी सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत. जर त्यांनी आचारसंहितेपूर्वी टोल धोरण सादर केले नाही तर आम्ही पुन्हा नव्याने लढा उभारू. सरकारने टोल धोरणाचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील नागरिकांनी टोल भरू नये. तसेच कंत्राटदारांनीही तो जबरदस्तीने वसूल करू नये. अन्यथा कत्रांटदाराच्या घरी जाऊन आम्ही धूमाकुळ घालू.
महाराष्ट्रात टोल वसुलीतून लुट होत असल्याचे सांगताना राज यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील टोलच्या रस्त्यांची व टोलच्या रक्कमेची माहिती दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बीओटी धोरणात चुका झाल्याचे मान्य करीत पुढील काळात या त्रुटी दूर करणार असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर 10 कोटींच्या आतल्या रक्कमेच्या प्रकल्पावरील टोलनाके बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती दिली. अशाप्रकारे राज्यातील एकूण 28 टोलनाके बंद होणार आहेत.
थोडक्यात वाचा, कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली
- प्रत्येक टोलनाक्यावरून रोज किती वाहने गेली याची अचूक माहिती देणारी यत्रंणा उभारण्याचे आश्वासन
- प्रत्येक टोलनाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आश्वासन
- बंद झालेल्या टोलनाक्यावरील बुथ हलवणे
- 10 कोटीच्या आतील रक्कमेचे एकून 28 टोलनाके बंद होणार
- अर्धवट प्रकल्पाचे टोल वसुली बंद करणार
- टोल आकारणीचे मूल्यमापन करून योग्य निर्णय घेणार
- ठाण्यावरून मुंबईकडे जाताना लागणारा ऐरोलीचा टोलनाका बंद होणार
- तांत्रिक पातळीवर सुधारणा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- एसटी, बीएसटीला टोलमधून सूट मिळावी
- टोलवर करारानुसार सर्व सुविधा उपलब्ध होणार, 200 अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणार
- सर्व्हिस रोड व पर्यायी रोड याबाबत उपलब्धता करून देणे
- बीओटीवरील रस्ते खराब होणार नाहीत याबाबत कंत्राटदाराने खबरदारी घेणे.