आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Press Meet News In Marathi, Maharashtra Rajya Board In Belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार बेळगावप्रश्नी गप्प का? राज ठाकरेंचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेळगावातील येळ्ळूरमधील महाराष्‍ट्र राज्याच्या फलक हटवल्यावरून कन्नडिगांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (सोमवार) मोदी सरकारवर शरसंधान साधले. बेळगावप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार गप्प का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.
राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर अमानुष लाठीचार्च केला. अक्षरशः त्यांच्या घरात घुसून मराठी भाषिकांना बेदम मारहाणही केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या घरांवर चिखल आणि दगडफेकही केली. कर्नाटकी पोलिसांच्या या मोगलाईचा राज ठाकरे यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सीमाप्रश्नी गंभीर नाहीत. महाराष्ट्राची बाजू ते केंद्र सरकारकडे योग्य पद्धतीने मांडत नाहीत. केवळ पत्र लिहून निषेध व्यक्त केल्याने प्रश्न सुटत नाहीत, असा टोलाही राज यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना लगावला आहे.

भाजपवरही तोंडसुख...
भारतीय जनता पक्षाला महाराष्‍ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचे काहीच घेणे-देणे नाही. भाजप याप्रकरणी पत्रक काढण्यापलीकडे काही करत नसल्याचेही राज ठाकरे म्हटले.

अवघ्या महाराष्ट्राने शिवसेना-भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. आता खासदारांनीच सीमाप्रश्न, सीमावासियांच्या भावना संसदेत मांडाव्या, असेही सांगून राज ठाकरे यांनी मराठी खासदारांचे लक्ष वेधले.

(फोटो: पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मराठी अस्मितेची मुस्कटदाबी.....