आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्टुलावरुनही राज ठाकरेंची दहीहंडी फुटणार नाही\', शिवसेनेचीही वादात उडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहीहंडी प्रकरणी भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने न्यायालयीन लढाई सुरु ठेवावी आणि अध्यादेश काढावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता दहीहंडी प्रकरणी मनसेपाठोपाठ शिवसेनाही मैदानात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे, राज ठाकरे स्टुलावर उभे राहिले काय आणि मोठ्या शिडीवर राहिले काय त्यांना निवडणुकीची दहीहंडी फोडता येणार नाही, अशी बोचरी टिप्पणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
मशिदींवरील लाऊड स्पिकर काढण्याचे आणि रात्री दहा ते सकाळी सहा स्पिकर न वापरण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही राज्य सरकार कारवाई करण्यात कमी पडत आहे. उलट हिंदूच्या सणांवर निर्बंध लादले जात आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
अशी आहे राज ठाकरे यांची भूमिका
दहीहंडीबाबत गोविंदा आणि आयोजकांची बाजू समजून न घेताच परस्पर निकाल देत निर्बंध घातले असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही दहीहंडीच्या तयारीला लागा, न्यायालयाचे काय ते मी बघतो,’ अशा शब्दांत गोविंदा पथकांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देत राज यांनी थेट न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दंड थोपटले.

स्टूलवर चढून हंडी फोडायची? : राज
वीस फुटांची मर्यादा घातल्यानंतर आता काय स्टुलावर चढून हंडी फोडायची का, असा टोलाही राज यांनी लगावला. सरसकट बंदी घालण्यापेक्षा आचारसंहिता निश्चित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. न्यायालयात योग्य प्रकारे भूमिका मांडली गेली नसल्याबद्दल सरकारवरही त्यांनी टीका केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन वाचा काय म्‍हणाले राज ठाकरे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...