आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनाथसिंहांनी फटकारल्यानंतरही राज ठाकरे यांचा मोदीमंत्र सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मोदीमंत्र मात्र सुरूच आहे. नायगाव आणि वर्सोवा येथे झालेल्या सभांमध्ये राज यांनी मोदी यांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चर केला. 2011 मध्येच आपण मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत हे सांगितले होते, असे ते म्हणाले. दरम्यान, मोदींच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा द्यायचाच असेल तर भाजपमध्येच विलीन व्हा, अशी स्पष्ट भूमिका राजनाथ यांनी मांडल्याने मनसेची राजकीय कोंडी झाली आहे. आता राज ठाकरे यापुढे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.