आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतियांच्या मतावर भाजपचा डोळा, राज ठाकरेंचा दिव्यातील सभेत शिवसेना-BJPवर हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय जनता पक्षाचा परप्रांतियांच्या मतांवर डोळा आहे. स्थानिकांना तर त्यांनी गृहितच धरले आहे. त्यामुळे पाच वर्षातून एकदा मिळणारी संधी दवडू नका. मनात असलेला राग मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिवा येथील जाहीर सभेत केले. शिवसेना आणि भाजप यांचे काँग्रेस - राष्ट्रवादी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूका वेगवेगळ्या लढतात आणि नंतर सत्तेसाठी एकत्र येतात. 
 
राज यांचा टोला - चारही पक्ष एकत्र बसतात
- ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर अशा एका जिल्ह्यात 7 महानगर पालिका असलेला देशातील एकमेव जिल्हा म्हणजे ठाणे आहे. 
- ठाणे हा देशातील एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यामध्ये 7 महानगर पालिका आहेत. त्या परप्रांतियांमुळे निर्माण झाल्याचा आरोप ठाकरेंनी केला. 
- परप्रांतियांना शहरात आणून बसवण्याचे काम शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी केले आहे. हे चारही पक्ष एकत्र बसतात आणि अनधिकृत बांधकामे वाढवण्याचे काम करत असल्याचा आरोप राज यांनी केला. 
- 20-25 वर्षे शिवसेना-भाजपला हे ठाणे शहर दिले होते. त्यांनी काय वाढवले तर अनधिकृत बांधकामं. यासाठी दिली होती का सत्ता, असा सवाल राज यांनी केला.
- रस्त्यावरुन बैलगाडी जाऊ शकत नाही असे रस्ते आहेत. 
- उद्योगपतींनी सीएसआरच्या माध्यमातून नाशिकमध्ये केलेल्या कामातून नाशिक सुंदर केल्याचा दावा केला. 
- सीेएसआरमधून काम होऊ शकते, हा विचारही शिवसेना-भाजप करु शकत नाही, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, कारण त्यामध्ये उद्योगपतींचे लोक काम करतात. त्यातून राजकीय पक्षांना भ्रष्टाचार करण्याची, मलिदा खाण्याची कोणतीच संधी मिळत नाही.
 
'शिवसेना सत्तेला चिकटून, अपमान वाटतो तर सोडून द्या' 
- शिवस्मारकाचे जलपूजन करताना नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच बोटीत होते. मात्र मोदींनी ढुंकूनही पाहिले नाही. तो शिवसेनेचा अपमान नव्हता का? असा सवाल करत तेव्हाच राजीनामा देऊन मोकळे व्हायचे होते असे राज ठाकरे म्हणाले.
- शिवसेना आता सांगत आहे, की आमचा अपमान होत आहे. केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे तेव्हा तुम्हाला अपमान वाटत नाही. 
- फक्त पैसे घेऊनच तुम्ही मतदान करणार असाल तर तुम्हाला बकाल आवस्थेतच राहावे लागेल, असे सांगत राज ठाकरे यांनी मतदारांना कोण तुमच्याकामाचा आहे हे ओळखून मतदान करण्याचे आवाहन केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...