आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत, मुख्य टोल लवकरच बंद होण्याची गरज - राज ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सरकारने छोट्या कारला 53 टोल नाक्यावर दिलेल्या सुट स्वागतार्ह्य असल्याचे सांगत, मुख्य आणि महत्त्वाच्या शहरातील टोल नाक्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने राज्यातील 53 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट आणि 12 टोलनाके बंदची घोषणा केल्याच्या निर्णयाचे राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. 'कृष्णकुंज' निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राज यांनी टोल नाक्यांचा व्यवहार पारदर्शक झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
ते म्हणाले, राज्य सरकारने आज केलेली घोषणा स्वागतार्ह्य आहे, पण टोलचा कारभार पारदर्शक होण्याची गरज आहे. 10-20 कोटींचा खर्च झालेल्या रस्त्यांसाठी टोल सुरु आहेत, ते तत्काळ बंद करण्याची गरज होती. टोलचा कारभार परदर्शक होण्याची गरज व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, 'टोल नाक्यांचा व्यवहार कॅशलेस झाला पाहिजे. केवळ 12 टोल बंद करुन भागणार नाही. राज्याला टोलमुक्त करण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.'
देवेंद्र फडणवीस स्वच्छ मुख्यमंत्री असल्याचे सांगत राज म्हणाले, की त्यांच्यावर अद्याप एकही डाग लागलेला नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्रला खूप आपेक्षा आहेत.