आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळीत पाण्‍याची नासाडी करणा-या उत्‍तर भारतीयांची धुलाई करा - 'राज'गर्जना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील उत्‍तर भारतीय होळी साजरी करताना पाण्‍याचा अपव्‍यय करत असतील तर, त्‍यांना आधी हात जोडून समजवा. तरीही त्‍यांना कळत नसेल तर त्‍यांची धुलाई करा असा इशारा मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्‍यांना दिला आहे. ठाण्‍यामध्‍ये बैठक घेऊन त्‍यांनी उत्‍तर भारतीयांवर निशाणा साधला आहे.
- राज ठाकरे म्‍हणाले, होळीच्‍या दिवसात पाणी बचतीसाठी उत्‍तर भारतीयांना हात जोडून विनंती करा. तरी ते तयार झाले नाही तर त्‍यांची धुलाई करा.
- 'लोकांना कोरड्या रंगात होळी खेळायची सांगा. त्‍यानंतरही त्‍यांनी पाण्‍याची नासाडी केलीच तर, मनसे स्टाईल्‍स हिसका दाखवा.'
- राज यांनी कार्यकर्त्‍यांना सर्व मराठी सण उत्‍सवांची यादी दाखवून हे उत्‍सव साजरे व्‍हायलाच हवे असे सांगितले.
- यामध्‍ये त्‍यांनी गुढीपाडवा, टीळक जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आदी सणांचा उल्‍लेख केला.
- ते म्‍हणाले परप्रांतीय मुंबईमध्ये त्‍यांचे उत्‍सव धुमधडाक्‍यात साजरे करतात तर आपण का नाही करू शकत.
महाराष्‍ट्राच दुष्‍काळजन्‍य परिस्‍थिती..
- महाराष्‍ट्रात सध्‍या दुष्‍काळाची परिस्‍थिती असल्‍याने पाण्‍याची टंचाई आहे.
- सध्‍या पाण्‍याची तीव्र टंचाई असल्‍याने राज्‍य सरकारला कठोर निर्णय घ्‍यावे लागले आहेत.
- जुलैपर्यंत शहरातील कोणत्‍याही स्वि‍मिंग पूलला पाणी न देण्‍याचे सरकारने म्‍हटले आहे.
- त्‍यामुळे होळीच्‍या दिवशी रेन डान्‍सलाही पाणी मिळणार नाही.
- मुख्‍यमंत्र्यांनी पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍यासाठी आदेश दिले आहेत.
- मराठवाड्यात केवळ 5% पाणी शिल्‍लक आहे.
बातम्या आणखी आहेत...