आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रदिनी हुतात्मा स्मारकाची परिस्थिती पाहून नालायक भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले, अशा संतापजनक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर रविवारी येथे टीका केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. भाजप आणि शिवसेना दोघेही सत्तेत असतानादेखील या स्मारकाचा योग्य तो मान राखला गेला नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. दरवर्षी महाराष्ट्र दिनाला हुतात्मा चौकाला सजावट केली जायची. महाराष्ट्र शासन याची संपूर्ण जबाबदारी घेऊन हे स्मारक सजवायचे. मात्र, यंदा या स्मारकावर एक साधं फूलही दिसत नाही. ही महाराष्ट्र सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आज जे चित्र दिसतंय ते घाणेरडं आहे. भाजप आणि शिवसेना दोघेही सत्तेत असताना या स्मारकाचा योग्य तो मान राखला गेला नाही. मला दुर्दैवाने म्हणायला लागतंय की, नालायक भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्या काळात निदान या स्मारकाची सजावट तरी केली जायची, असेही ते म्हणाले. दरम्यान, आज हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप-सेनेचे काही नेते वगळता अन्य कुणीही फिरकले नाही.
हुतात्मा चौकाला निशाणा करू नये

राज ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, राज यांचा राजकीय अभ्यास कच्चा आहे. हुतात्मा चौक राजकारणाचा अड्डा होता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. मनसे पक्ष त्यांचे राजकीय स्थान गमावून बसले आहे. स्वतःची राजकीय जागा बनवण्यासाठी त्यांनी हुतात्मा चौकाला निशाणा करू नये. आशिष शेलार, अध्यक्ष,भाजप, मंुबई
बातम्या आणखी आहेत...