आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांचे भाषण पुरावा नाही : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून सुरू असलेल्या वादात जयदेव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मार्च २०१४ मधील भाषणांची सीडी उच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर केली. मात्र, उच्च न्यायालयाने असे भाषण पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नसल्याचे सांगितले. राज यांनी ठाणे पालिका निवडणुकीदरम्यान सेंट्रल मैदानावर भाषण केले होते. यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही सीडी जयदेव यांनी पुरावे म्हणून न्यायालयात सादर केली. मात्र, पुरावा म्हणून अशी सीडी ग्राह्य धरता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने जयदेव यांची मागणी फेटाळून लावली. दरम्यान, बाळासाहेबांच्या मृत्युपत्रावरून जयदेव यांनी गेल्या सुनावणीत गंभीर आरोप केले होते. याप्रकरणात आता बाळासाहेब यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांची साक्ष लवकरच न्यायालयात होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...