आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स बारमालकांशी मुख्यमंत्र्यांचे संगनमत, राज ठाकरे यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डान्स बारच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘विरोधात असताना डान्स बारच्या मुद्द्यावर तत्कालीन ‘राज्य सरकारचा गृहपाठ कमी पडला' असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आता गृहपाठ कमी पडला की त्यांची डान्स बार बंदी लागू करण्याची इच्छाशक्ती नाही?’ असा सवाल ठाकरेंनी केला. तसेच बारमालकांशी मुख्यमंत्र्यांचे संगनमत असल्याचा अाराेपही आहे.
राज्य सरकारने डान्स बारवर लादलेल्या अटी कमी करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दणका दिला. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले असतानाच त्यात आता मनसेचीही भर पडली आहे. ठाकरे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे राज्य सरकारची या मुद्द्यावरून जोरदार खिल्ली उडवली. या पत्रकात ठाकरे म्हणतात, ‘डान्स बारमुळे हजारो कुटंुबे अक्षरश: उद््ध्वस्त झाली आहेत. न्यायालयासमोर कितीतरी विषय प्रलंबित आहेत. त्यांचा वर्षानुवर्षे निकाल लागत नाही. मात्र, डान्सबारसारख्या विषयावर इतक्या झटपट निर्णय कसा लागतो? हे सरकार जितकी आस्था डान्सबारबाबत दाखवते, तशीच त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत दाखवली तर जनता त्यांना दुवा देईल. रोजगाराचाच प्रश्न असेल तर मग मटका आणि बेटिंगही अधिकृत करावे, जमल्यास चोरी- दरोड्यांनाही मान्यता द्यावी,’ असा टोलाही राज यांनी सरकारला लगावला.