आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरे पार्कवर राज ठाकरेंचे प्रसार माध्‍यमांनाच फटकारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्‍ट्र न‍वनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी आज इतर कोणाला नव्‍हे तर प्रसार माध्‍यमांनाच फटकारले. मी मराठी माणसांमध्‍ये भांडणे लावण्‍यासाठी पक्ष काढलेला नाही. महाराष्‍ट्र आणि मराठी माणसांकडे वाकड्या नजरेने पाहणा-यांना ठोकण्‍यासाठी पक्ष काढलेला आहे, असे राज ठाकरे म्‍हणाले.

शिवडी मतदारसंघातील क्रिडा संकुलाच्‍या भूमीपुजनाला ते प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते. नरे पार्क येथे हा कार्यक्रम झाला. त्‍यावेळी त्‍यांनी सांगितले, की या ठिकाणी असलेल्‍या जनतेला हवे असेल तर क्रिडा संकुल नक्‍कीच पूर्ण होईल. क्रिडा संकुलामध्‍ये तार होणा-या स्विमिंग पूलमध्‍ये मराठी मुलं आणि मुलींच डुंबली पाहिजेत. इतर कोणी आला तर त्‍याला बाहेर काढून द्या, असे राज ठाकरे म्‍हणाले.