आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कोकण दौऱ्यादरम्यान राज यांनी घेतला Nature Photography चा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात मनसेची झालेली दयनिय परिस्थिती पाहाता राज यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. राज यांच्या या दौऱ्यातून ते कोकणातील पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आज राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण इथल्या सवतसडा धबधब्याचा आनंद घेतला आणि धबधब्याची मनसोक्त छायाचित्रेही घेतली. तसेच राज यांनी बुरोंडी (दापोली) येथील भगवान परशुरामांच्या ४० फुटी भव्य स्मारकाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. सोबतच राज यांनी चिपळून येथील DBJ महाविद्यालयाला भेट व विद्यार्थ्यांसोबत चर्चासत्रही घेतले. या दौऱ्याची सर्व छायाचित्रे "निवडणूक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या" फेसबुक पेजवर शेअर करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, राज ठाकरे यांची कोकण दौऱ्याची काही निवडक छायाचित्रे.
बातम्या आणखी आहेत...