आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या मदतीला मनसे सरसावली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठवाड्यासह विदर्भ दुष्काळाने होरपळत आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे. त्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौ-यावर दहा दिवसासाठी जात आहेत. 19 एप्रिलपासून सुरु होणा-या राज यांच्या दौ-याची 29 एप्रिल रोजी सांगता होईल. राज ठाकरे औरंगाबादसह जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद भागाचा दौरा करणार आहेत. दुष्काळग्रस्तांना मदत कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार करण्यात येईल असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात राज यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. राज आता मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार असल्याने ते काय भूमिका घेतात व मांडतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
मनसे मदतीला धावणार-
मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण हे मराठवाडा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या 3000 लिटर्सच्या टाक्या वाटणार आहेत. या टाक्यांची पहिली कुमक 3 ट्रकद्वारे 25-30 टाक्या घेवून बुधवारी लातूर जिल्ह्यात पोहचेल. तर त्यानंतर दोन दिवसांनी आणखी 50 टाक्या घेवून बीड जिल्ह्यात वाटल्या जातील. मुंबई महापालिकेच्या सर्व नगरसेवक स्व:खर्चातून बीड जिल्ह्यातील 2 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे बंधारे घालून देणार आहेत अशी माहिती महापालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. ही फक्त सुरुवात आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौ-यावर गेल्यानंतर परिस्थितीचे अवलोकन करून मदतीचा नवीन तपशील जाहीर केला जाईल असेही मनसेने म्हटले आहे.
पुढे स्लाईडसच्या माध्य़मातून पाहा, राज ठाकरे 10 दिवस मराठवाड्यात कोणत्या दिवशी कुठे फिरणार...
बातम्या आणखी आहेत...