आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray\'s Agitation Hit Or Floop?, Oppostions Critics On Mns Stand

मनसेचे आजचे \'रास्ता रोको\' आंदोलन हिट की फ्लॉप?, विरोधकांची चौफेर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज एक दिवसाचे रास्ता रोको आंदोलन अवघ्या 4 तासांत पक्षप्रमुख राज ठाकरेंनी स्थगित केले. सकाळी नऊ ते दुपारी 1 या काळात मनसेने राज्यभरातील प्रमुख शहरात रास्ता रोको केले. राज्यातील प्रमुख महामार्ग वगळता सर्वत्र जनजीवन नेहमीप्रमाणे व्यवस्थित सुरु होते. त्यामुळे आजच्या मनसेच्या रास्ता रोकोचा सामान्य नागरिकांना फारसा त्रास झाला नाही. दरम्यान, राज ठाकरेंनी 4-5 तासांतच रास्ता रोको आंदोलन का स्थगित करण्यात आले यावरून सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. दुपारी 1 वाजता राज ठाकरेंना पोलिसांनी सोडून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, आम्हाला सरकारला जो संदेश द्यायचा होता तो दिला आहे. लोकांना त्रास व्हावा असा आमचा उद्देश नव्हता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या सकाळी 9 वाजता सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित करीत आहोत.
मनसेचे आजचे रास्ता रोको आंदोलन यशस्वी झाले की अयशस्वी याकडे आता चर्चा वळाली आहे. राज ठाकरेंनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन शांततेत होईल हे अपेक्षित होते. पण ते खणखणीत होईल असे त्यांनी सांगितले होते. मात्र ते खणखणीत झालेच नसल्याचा सूर महाराष्ट्रातून उमटू लागला आहे. त्यामुळे मनसेची आजच्या रास्ता रोकोची व्यूहरचना चुकली की मनसेला त्याचे मायलेज घेता आले नाही असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी राज आणि मनसेवर चौफेर टीका केली आहे. तसेच लोकांच्या मुद्यांवर नसलेले आंदोलन उभे केल्यास 'फियास्को' झाल्याशिवाय राहत नाही अशी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आम आदमी पक्ष व उरले-सुरले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही राजच्या आजच्या आंदोलनावर व मनसेवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, राज ठाकरेंना याआधीच चर्चेला बोलवले होते. त्यामुळे आजचे आंदोलन करण्याची गरज नव्हती. तसेच तोडफोड करून प्रश्न सुटत नाहीत.
पुढे वाचा, अजित पवार, गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, संजय राऊत यांनी काय म्हटले आहे मनसेच्या रास्ता रोकोवर...