आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray\'s Doughter Victim Of Minor Accident

राज यांच्या कन्येला अपघात, हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- ऊर्वशी हिचा अपघात झाल्याची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रविवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात जाऊन ऊर्वशीची भेट घेतली. तसेच राज ठाकरे यांच्याकडेही तिच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.)
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कन्या ऊर्वशी रविवारी दुचाकीवरून पडल्याने किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऊर्वशी यांची प्रकृती ठीक आहे. मात्र यामुळे राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित राज्यव्यापी दौरा तीन ते चार दिवसांनी पुढे ढकलल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांनी दिली. या दौ-याचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह रुग्णालयात जाऊन ऊर्वशीच्या प्रकृतीची विचारपूस केली.