आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शायनाचे वडील चुडासमा यांच्या ऑफिसची तोडफोड, का फोडले ते, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‪मुंबई- सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वकील नाना चूडासमा यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला बॅनर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडला आहे. भाजपच्या नेत्या शायना एनसी या नाना चूडासमा यांच्या कन्या आहेत. संबंधित बॅनरवर मराठीविषयी अवमानकारक मजकूर छापल्याचे सांगत बॅनर फाडल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नाना चुडासमा हे चालू घडामोडींवर भाष्य करतात व त्याचा बॅनर बनवून कार्यालयाबाहेर लावतात. नुकताच त्यांनी राज्य सरकारने मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर बॅनरद्वारे भाष्य केले होते.
दरम्यान, या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मरीन ड्राइव्हवरील एन एस रोडवर नाना चुडासमा यांचे चायना महाल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यलय आहे. या कार्यालयाबाहेर एक बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर 'प्रमोटिंग मराठी वेलकम, बट डिक्टेट इज नॉट वेलकम’ (मराठी चित्रपटाच्या प्रसाराचे स्वागत आहे, मात्र त्यासाठी करण्यात येणारी हुकूमशाही मान्य नाही) असे लिहिले होते. मनसेचे स्थानिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. बुधवारी सायंकाळी 4-5 कार्यकर्ते काहीही कळायच्या आत अचानक या कार्यालयावर धडकले व बॅनर्स फाडला. त्यावेळी त्यांनी 'मराठी माणसांचा विजय असो, नाना चुडासमा मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्या बॅनरची होळी करून पेटवून दिले व तेथून निघून गेले. यानंतर चुडासमा यांच्या कार्यालयातील लोकांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्या शायना एसी या नाना चुडासमा यांच्या कन्या आहेत. शायना यांनी मनसेच्या अरेरावीचा निषेध केला आहे. नकारात्मक राजकारण करून काहीही होणार नाही. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. तो बॅनर मराठीच्या विरोधात नव्हे मराठी भाषेत बोलण्याच्या बाजूने होता. माझे वडील चालू घडामोडीबाबत अनेक कोट ( प्रतिक्रिया) बनवितात व त्याचा बॅनर करून लावतात. मराठीबाबतचा बॅनर आम्ही पुन्हा लावणार आहे असे शायना यांनी सांगितले.
पुढे पाहा, या संबंधित छायाचित्र आणि नाना चुडासमा यांनी यापूर्वी काय काय बॅनर लावले होते... ते छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा...