Home »Maharashtra »Mumbai» Raj Thackerays Sabha In Thane

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला अखेर परवानगी; बाळा नांदगावकरांनी घेतली पोलिसांची भेट

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 21:45 PM IST

मुंबई- मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नौपाडा पोलिसांची भेट घेतल्यानंतर गडकरी रंगायतन येथील सभेला पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे. राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर होणार आहे.
सुरुवातीला राज ठाकरे यांची सभा ठाणे स्टेशन परिसरात घेण्याचे ठाणे मनसैनिकांनी निश्चित केले होते. तेव्हा सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, याच ठिकाणी सभा व्हावी यासाठी मनसैनिक प्रयत्नशील होते. दरम्यान, सोमवारी मनसे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या एक बैठक झाली. त्यानंतर सोमवारी रात्री राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ठाण्यात येऊन सभेच्या जागेची पहाणी केली. त्यानंतर या जागेला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended