आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray's Son Amit Become Active In Politics

‘राज’पुत्रही राजकारणाच्या वाटेवर, झाडे वाचवण्यासाठी घेतली मनपा आयुक्तांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मनसेच्या वृक्ष वाचवा मोहिमेत सहभागी झालेले अमित राज ठाकरे.
मुंबई - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेने सपाटून मार खाल्ल्यानंतर दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे खडबडून जागे झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य यांच्याप्रमाणेच आता राज यांनी आपले पुत्र अमित यांनाही सक्रिय राजकारणात उतरवण्याची पावले उचलली आहेत. त्यामुळेच आजवर राजकारणापासून दूर असलेल्या अमित यांनी साेमवारी झाडे वाचवण्याच्या निमित्ताने मुंबई मनपा आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली.

कुंटे यांची भेट घेण्यापूर्वी अमित यांनी मनपातील मनसेच्या कार्यालयात पक्षाच्या नगरसेवकांशी संवाद साधला. त्यांची ओळख करून घेतली आणि पर्जन्यवृक्षांबाबत माहिती घेतली. कोणत्या वाॅर्डात किती वृक्ष कमी झाले, त्यावर पक्षाने काय केले आणि वृक्ष वाचवण्यासाठी पुढे काय केले पाहिजे याची माहिती घेतली. त्यानंतर अमित यांनी आयुक्तांशी २० मिनिटे चर्चा केली. या वेळी त्यांनी पर्जन्यवृक्षांबाबतचे सादरीकरण दिले. तसेच उपग्रहाद्वारे पर्जन्यवृक्षांची काढलेली छायाचित्रे दाखवली. गोरेगाव तसेच शिवाजी पार्क येथील झाडे कमी होत असल्याचेही निदर्शनास आणून देत त्यावर काय प्रयत्न केले जाऊ शकतात याची माहितीही
कुंटे यांना दिले.

पुढे वाचा .. आगे आगे देखो होता है क्या!