आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray\'s Speech & MNS At Dadar, Everything Is Set & Ready

गुढीपाडवा मेळावा: MNS अध्यक्ष राज ठाकरेंनी साधला भाजप-RSS वर निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अच्छे दिनाचे स्वप्न तुम्हीच दाखवले, मात्र आज तुम्ही केलेले काम दिसत नाही म्हणून संघाच्या आडून "भारतमाता की जय'सारख्या नवनव्या टूम काढल्या जात आहेत,’ असा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप संघावर थेट निशाणा साधला. ‘राष्ट्रवादाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवू नका. काश्मीरमध्ये अफझल गुरूला नायक मानणाऱ्या ‘पीडीपी’शी युती कशी करता,’ असा सवाल करतानाच ‘ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच जर गळा कापला तर मग या सत्ताधाऱ्यांचे करायचे काय?’ अशा शब्दांत राज यांनी भाजप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना लक्ष्य केले.

गुढीपाडव्याचे अाैचित्य साधून राज यांनी शिवाजी पार्कवर भव्य सभा घेतली. अपेक्षेनुसार त्यांनी भाजप शिवसेनेला लक्ष्य केले. "भारतमाता की जय हा नारा आपण लहानपणी इंदिरा गांधींच्या ताेंडून ऐकला होता. भारताबद्दल आम्हालाही अभिमान आहे; पण म्हणून ऊठसूट कधीही आपण हा नारा देत नाही. घरातून निघताना कुणी भारतमाता की जय म्हणतो का,’ अशा शब्दांत राज यांनी भाजपची खिल्ली उडवली. ‘मुख्यमंत्रिपदावरून काढले तरी भारतमाता की जय म्हणणार, असे फडणवीस सांगतात. अरे पण तुम्हाला कोण काढतोय मुख्यमंत्रिपदावरून. नकाे त्या गोष्टी करण्यापेक्षा महाराष्ट्रात जे वाईट चालले अाहे ते पहिले बंद करा,’ असे सुनावत अपयश लपवण्यासाठीच भाजप असे वाद उकरून काढत असल्याचे राज म्हणाले. एमअायएमवर टीका करताना अाेवेसी बंधू हे भाजपनेच फायनान्स केलेले अाहेत, असा अाराेपही केला.

अर्धवट आंदोलनाबाबत मनसेवर हाेणाऱ्या अाराेपाचे खंडन करताना राज यांनी पुन्हा भाजप शिवसेनेला खडे बोल सुनावले. ‘राममंदिर जैतापूर आंदोलनाचे पुढे काय झाले?’ असा सवाल करत ते म्हणाले की, ‘राममंदिर आंदोलनात हजारो कारसेवक मारले गेले. मशीद पडली; पण हे सांगतात प्रकरण अाता न्यायप्रविष्ट आहे. पण जर अमित शहा जर एखाद्या न्यायप्रविष्ट प्रकरणातून बाहेर पडत असतील, तर मग राममंदिराचा प्रश्न का सुटत नाही?’ असा प्रश्न करत राज यांनी भाजपची कोंडी केली. सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवरही राज बरसले. ‘पाकिस्तानचा विरोध दाखवत सत्तेवर आलात, मग तरीही आज समझोता एक्स्प्रेस का सुरू आहे. जर पटत नसेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा,’ असे अाव्हानही दिले.

दुष्काळावरून मुख्यमंत्र्यांना केले लक्ष्य
‘दुष्काळीमराठवाड्यात साखर कारखाने काढले. त्यामुळे बाराशे फूट बोअर खणूनही पाणी मिळत नाही. फक्त नेत्यांच्या स्वार्थासाठी दुष्काळग्रस्त भागात साखर कारखाने, बिअरचे कारखाने का काढले जातात? अशी परिस्थिती राहिली तर २०५० पर्यंत मराठवाड्याचा वाळवंट हाेईल, असा निष्कर्ष नॅशनल जिऑग्राफिकने काढला अाहे,’ याकडेही राज यांनी लक्ष वेधले. ‘काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या करत होता भाजपच्या राज्यातही करताेय. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? कुणी दुष्काळाचा विषय काढला की मुख्यमंत्री जलयुक्त शिवारचे कौतुक करतात. मात्र, या योजनेतून ३३ हजार विहिरी कुठे बांधल्या ते आम्हाला दाखवा,’ असे आव्हानही त्यांनी दिले. फडणवीस माणूस भला आहे. मग त्यांनी कॉम्प्युटर क्लासेस टाकावेत, असा चिमटा काढून राज यांनी फडणवीसांची नक्कलही करून दाखवली.

मोदींनी कापला केसाने गळा
‘माेदींचेअाधी काैतुक मग अाताच विराेध का?’ असा सवाल आपल्याला केला जाताे. टाटांनी गुजरातची तारीफ केली म्हणून मी तिथे गेलाे हाेताे. गुजरातच्या प्रगतीवर जरी समाधान व्यक्त केले असले तरीही महाराष्ट्रच नंबर वन असल्याचे म्हटले होते मोदींसारख्या पंतप्रधानांची गरज आहे, हे मीच सर्वात आधी बोललाेे; पण माेदी पंतप्रधान झाल्यावर बदलले,’ असा आरोप राज यांनी केला. विराेधात असताना सराफांच्या मागण्यांसाठी अाग्रही असणाऱ्या माेदींनी अाता सराफांसाठी जाचक कायदा अाणला,’ असे राज म्हणाले.

हा तर बाळासाहेबांचा अाशीर्वाद !
पोलिसांच्याअंदाजानुसार सभेला ५० हजारांची गर्दी होती. सभेपूर्वी दादर स्थानकापासून ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्ते सभास्थानी येत होते. सभेच्या परिसरात सकाळी गुढीपाडव्यानिमित्त शिवसेनेची शोभायात्रा असल्यामुळे परिसरात मनसेच्या झेंड्यासोबतच शिवसेनेचेही झेंडे दिसत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे नाव घेता राज म्हणाले की, ‘आत्मविश्वास नसला की हे असे होते. राज्यात सत्ता यांची आणि हे आम्हाला घाबरतात. आमच्या सभेपूर्वी असे झेंडे लावून केलेला हा केविलवाणा प्रयत्न पाहून आपल्याला यांची कीव येते,’ असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र, ‘शिवसेनेचे झेंडे म्हणजे मला मिळालेला बाळासाहेबांचा आशीर्वाद,’ असे वाक्य राज यांनी उच्चारताच गर्दीतूनही जोरदार प्रतिसाद मिळाला.
अपडेट्स
> फडणवीस म्‍हणाले महाराष्ट्रात 33 हजार विहिरी बांधल्यात त्या कुठे आहेत?
> विदर्भाकडे 15 वर्षं मुख्यमंत्रीपद होते,तरी विदर्भाचा विकास का झाला नाही. हा दोष महाराष्ट्राचा का ? राज ठाकरे
> स्वतंत्र विदर्भ-मराठवाड्याला मनसेचा विरोध. तुकडे करायला महाराष्ट्र म्हणजे काय केक नव्हेः
> महाराष्‍ट्रात जे चालताय ते थांबवा, मग भारत माता की जय म्‍हणा
> मुख्यमंत्रीपद गेले तरी भारत माता की जय म्हणणारच, पण तुमचा राजीनामा तरी कोण घेणार
> आदिवासी बांधवांचा पैसा पळवणारे खरे देशद्रोही
> सिंचनात घोटाळा करणारे खरे देशद्रोही - राज ठाकरे
> शेतकरी आत्महत्यांना जबाबदार खरे देशद्रोही
> आदिवासी बांधवांचा पैसा पळवणारे खरे देशद्रोही
> ओवेसी बूंध भाजपने फायनान्‍स केलेली पार्टी
> सर्वाधिक विदेश दौरे करणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान. त्‍यांच्‍या इतके दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाने केले नाहीत.
> भारतात इथे पाकिस्‍तानला शिव्‍या घाततात आणि अचानक विमान वळवून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्‍छा द्यायला जायचे.
> मोदींसारख्या पंतप्रधानाची गरज आहे, हे मी बोललो होतो.
> मात्र सत्‍तेत येताच मोदी बदलले
> गाडगेबाबांनी स्‍वच्‍छता मोहीम सुरू केली. पण, ते महाराष्‍ट्रातील असल्‍यामुळे त्‍यांचे नाव चालत नाही.
परिसर नीट करा, स्‍वच्‍छ करा
राज ठाकरे यांनी 59 मिनिटं भाषण केले. भाषणांचा समारोप करताना ते म्‍हणाले, '' शिवतीर्थाच्‍या परिरात जिथे, कुठे पक्षाचे झेंडे लावलेली असतील ते काढून सोबत घेऊन, आपल्‍याला हा परिसर मोकळा करायचा'', स्‍वच्‍छ करायचा असे आवाहन त्‍यांनी केले.
पुढील स्लाइडमध्ये, मनसेची सभा शिवसेनेपेक्षा मोठी