आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray\'s Wife Gets 65 Stitches After Surgery. Dog Bites Her

यामुळे राज ठाकरे यांच्या पत्नीला चावला कुत्रा, चेहर्‍यावर प्लास्टिक सर्जरी, पडले 65 टाके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागली असून त्यांना तब्बल 65 टाके पडले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चेहऱ्याचा चावा घेतला होता. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी चार तास अवघड शस्त्रक्रिया करून त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. दरम्यान, शर्मिला ठाकरे यांचा पाय चुकीने कुत्र्याच्या अंगावर पडला होता. त्यानंतर संतापलेल्या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्याचा चावा घेतला. यावेळी कुत्र्याचे दात शर्मिला यांच्या चेहऱ्याच्या हाडांवर घासले गेले, असे सांगितले जात आहे.

शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीचा धोका पूर्ण टळला असून जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अजून आठवडाभर त्यांना रुग्णालयातच विश्रांती घ्यावी लागणार असल्याची माहिती डॉ. अनिल टिबरेवाला यांनी दिली. दिवसभरात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सिनेअभिनेता महेश मांजरेकर आणि अनेक मान्यवरांनी रुग्णालयाला भेट दिली. राज ठाकरे हेदेखील दिवसभर रुग्णालयात होते.