आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चगेट रेल्वे मोर्चाची राज ठाकरेंकडून जय्यत तयारी, पोलिस परवानगी देणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेच्या वतीने मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे सोशल मिडियाद्वारे आवाहन केले जात आहे. - Divya Marathi
मनसेच्या वतीने मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे सोशल मिडियाद्वारे आवाहन केले जात आहे.
मुंबई- रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी सरकार व रेल्वे प्रशासनावर राग व्यक्ती करण्यासाठी गुरुवारी (5 ऑक्टोबर) रेल्वेच्या मुख्यालय चर्चगेटवर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाची राज ठाकरेंकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. 
 
राज ठाकरेंनी याबाबत मोठी ताकद लावली असून ते मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे आदी भागातून पक्षाची ताकदीचा उपयोग करून घेणार आहेत. सोबतच राज यांनी आता किड्या- मुंग्यांसारखं मरणार नाही की आपल्या न्याय हक्कासाठी रेल्वे मुख्यालयावर धडक देणार असे विचारत मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे सोशल मिडियाद्वारे आवाहन केले जात आहे. त्यामुळे गुरुवारी होणा-या मोर्चाला मुंबई पोलिस परवानगी देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
 
मनसेचा मोर्चा मेट्रो सिनेमापासून सुरु होईल तो चर्चगेट रेल्वे स्टेशनवर थांबेल. गुरुवारी सकाळी साडेआकरा वाजता मोर्चा निघेल. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राज ठाकरे करतील. मागील आठवड्यात 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. सोबतच हा राग व्यक्त करण्यासाठी राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
 
अस्वस्थ आणि हताश रेल्वे प्रवासी राज ठाकरेंच्या भेटीला....
 
रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी सोमवारी राज ठाकरेंची भेट घेतली. प्रवाश्यांच्या विविध समस्यांकडे रेल्वे प्रशासन लक्ष तर देतच नाही पण प्रतिनिधींना भेटण्याचेही सौजन्य सुद्धा रेल्वे अधिकारी दाखवत नाही अशी तक्रार प्रतिनिधींनी राज यांच्याकडे केली. 5 ऑक्टोबरला मनसेच्या होणा-या धडक मोर्च्याच्या वेळेस रेल्वे अधिकाऱ्यांना तुम्ही पण तुमच्या मागण्यांचे निवेदन द्या, प्रशासनाला ती कामे वेळेत पूर्ण करायला भागू पाडू, असे आश्वासन राज यांनी रेल्वे प्रवाशांना दिले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबईकरांना सोशल मिडियातून आवाहन करणारा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...