आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RAJ THAKARE COMMENTED ON SHIVASENA CHIEF BAL THAKARE\'S MONUMENT

सेनेचा महापौर बंगल्यावर डोळा, राज ठाकरे यांचा आरोप, वाद पेटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली शिवसेनेला महापौर बंगला हवा आहे, असा थेट आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. ‘तुम्हाला स्मारक हवे आहे की महापौर बंगला,’ असा खोचक सवाल करत त्यांनी महापौर बंगल्यावर होणाऱ्या नियोजित स्मारकाला बाळासाहेबांच्या पुण्यतिथीलाच उघड विरोध केला आहे. तसेच महापालिका, राज्य आणि केंद्रात सत्ता असूनही बाळासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीसाठी तुम्हाला मुंबईत साधी मोक्याची जागा मिळत नाही, असा टोलाही शिवसेनेला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईच्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक होईल, अशी घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत या नियोजित स्मारकाला विरोध केला आहे. महापौर बंगला ही जागतिक वारसाहक्काच्या यादीतील वास्तू असून त्या ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक करण्याऐवजी मुंबईत एखाद्या मोक्याच्या ठिकाणी त्यांचे स्मारक करावे, असे राज म्हणाले. तसेच या स्मारकाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचे स्मारक हे लोकोपयोगी असावे. त्या ठिकाणाला भेट देणाऱ्याला त्या वास्तूमधून प्रेरणा मिळावी, हा त्या स्मारकाचा उद्देश असावा. बाळासाहेबांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे ही आपलीदेखील भूमिका अाहे. मात्र, त्यासाठी १९५६ पासून महापौर निवासस्थान अशी अोळख असलेल्या महापौर बंगल्याची जागा नको, अशी भूमिका राज यांनी मांडली.
शिवसैनिकांनी पुण्यतिथीला तरी तारतम्य बाळगावे
गेल्या वर्षी आपण बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. या वेळी मात्र आपण त्या ठिकाणी गेला नाहीत, या प्रश्नावर राज म्हणाले की, ‘मला तिथे जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. मी येता-जाता त्या स्मृतिस्थळाला वंदन करतच असतो. मात्र, मागच्या वर्षी जेव्हा मी त्या ठिकाणी गेलाे तेव्हा तिथे पक्षीय घोषणा दिल्या गेल्या.

अशा वेळी तारतम्य बाळगणे गरजेचे होते. स्मृतिदिनी बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी आपण येतो की पक्षीय घोषणा द्यायला, याचे भान बाळगायला हवे,’ असा सल्लाही त्यांनी उत्साही कार्यकर्त्यांना दिला.
पुढील स्लाइडस्वर वाचा, राज ठाकरे यांची फटकेबाजी...