आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेतील गैरप्रकारांवर राज ठाकरेंचा अंकुश, आरटीआय अर्ज न देण्याची तंबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसेतील कोणीही कार्यकर्ता पदाधिकारी उठतो आणि माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवतो. लोकशाहीच्या या अस्त्राचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचा निर्णय त्यांनी सोमवारी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेतला.

सोमवारी यशवंत नाट्यमंदिर येथे पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, पक्षातील काही लोक सतत ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मागवून त्याचा गैरफायदा घेत असत. याची माहिती राज यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. हे गैरवापर रोखण्यासाठी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. यापुढे मुख्य कार्यालयाला विचारल्याशिवाय माहिती अधिकाराखाली एकही अर्ज दाखल करू नये, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना सुनावले. तसेच या प्रकारावर आळा घालण्यासाठी सरचिटणीस स्तरावर तीन जणांची एक समितीही नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबईचे सहा विभागाध्यक्ष आणि एका शाखा अध्यक्षाची उचलबांगडी करून नव्या चेहर्‍यांची नेमणूक करण्यात आली. ‘लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार असून त्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. 500 लोकसंख्येमागे एक का