आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंना सशस्त्र अंगरक्षकासह हवाई प्रवास नाकारला, राज मुंबई विमानतळावरुन शांततेत घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही एअर इंडियाने गेल्या रविवारी पिस्तूलधारी अंगरक्षकासाेबत विमानात प्रवास करणे नाकारल्याचे समाेर अाले अाहे. मात्र तेथील कर्मचाऱ्याशी कुठलाही वाद न घालता मुंबई विमानतळावरून घरी परत जाणे राज यांनी पसंत केले.    
 
‘पिस्तूलधारी सुरक्षा रक्षकाला साेबत घेऊन तुम्हाला जाता येणार नाही,’ असे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी राज यांना सांगितले हाेते. त्यामुळे ग्वाल्हेर येथील नियाेजित दाैरा राज ठाकरे यांना रद्द करावा लागला हाेता. मात्र कुणावरही न चिडता ते परत घरी गेले हाेते.
बातम्या आणखी आहेत...