आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकरांनी माहिती नसेल त्या विषयात उगाच चोंबडेपणा करु नये; राज ठाकरेंची गर्जना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणे बंद करावे अशी सणसणीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. रंगशारदा सभागृहात पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने चांगलेच सुनावले. आम्ही अभिनंदन तुमचे केलं पाहिजे तिथे निरुपम तुमचे कौतुक करतो, अशी सणसणीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्यावर केली आहे.
 
फेरीवाल्यांविरोधात मनसेने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. अधिकाऱ्यांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची गरज पडल्यास केस टाकू, असेही त्यांनी सांगितले. फेरीवाल्यांसाठी कोर्टाच्या फेऱ्या मारा, असा टोलाही त्यांनी अधिकाऱ्यांना लावला. पुणे, मुंबई ही शहरे फेरीवाल्यांनी बकाल केली असल्याचे ते म्हणाले. फक्त मराठी माणसांसाठी कितीही केसस अंगावर घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाल्यांकडून 2 हजार कोटींचा हफ्ता मिळत असल्याचा आरोपही त्यांनी प्रशासन आणि सरकारवर केला. वर्ल्ड इकॉनिमिक  फोरमने मुंबई अधिक बकाल होत असल्याचे सांगितले.
 
रोज मुंबईत उत्तर प्रदेशातून 48 ट्रेन भरून येतात आणि रिकाम्या जातात असे त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकालगतच्या भाजीवाल्यांकडून भाजीही विकत घेऊ नका, असे ते म्हणाले. रिक्षा आणि टॅक्सीवाले तरी अधिकृत आहेत, असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील झोपडपट्टया कोणी भरल्यात असा सवाल करत त्यांनी मराठी अधिकाऱ्यांनी हे विष पसरणे थांबवावे असे आवाहन केले.  
बातम्या आणखी आहेत...