आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूकीत पक्ष सज्ज करण्‍यासाठी राज ठाकरेंनी घेतली आढावा बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज करण्यासाठी आणि ताकदीचा आढावा घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी राज्यभरातील संपर्क प्रमुखांशी माहीम येथील पक्ष कार्यालयात चर्चा केली. या वेळी उमेदवार निवड व अन्य बाबींबाबत आढावा घेण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याबरोबरच विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठरवले आहे. मात्र यासाठी आपला पक्ष आणि नेते तयार आहेत का याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी सोमवारी बैठक घेतली.

मनसेतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, राज ठाकरे यांनी प्रत्येक जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा अध्यक्षांबरोबर व्यक्तिगत चर्चा केली. या चर्चेत मतदारसंघात आपण कुठे कमी आहोत, कुठे सशक्त आहोत, मतदारांची संख्या वाढवण्यासाठी काय करावे लागेल याची चर्चा करण्याबरोबरच संभावित उमेदवारांच्या नावाबाबतही चर्चा केली. ज्या ठिकाणी कमजोर आहोत त्या ठिकाणी ताकद वाढवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत राज यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देशही पदाधिकार्‍यांना दिले. पक्षबाह्य काम करणार्‍यांवर, गटबाजी करणार्‍यांवर काय कारवाई करायची, दुसर्‍या पक्षातील कोणी आले तर त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, त्याला तिकीट द्यायची की नाही याबाबत प्राथमिक चर्चाही राज यांनी केल्याचे समजते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या दौर्‍याप्रमाणेच आता राज ठाकरे लवकरच पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.