आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या प्रस्तावाचे स्वागतच करु - उद्धव ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे यांच्या पक्षाशी युतीच्या प्रस्तावाचे स्वागतच करू, असे स्पष्ट करतानाच टाळी एका हाताने वाजत नाही. हा निर्णय दोन्ही बाजूंनी व्हावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एकत्र येण्यावर भाष्य केले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मात्र याबाबत सध्याच काहीही बोलणार नसल्याचे बुधवारी सभेत स्पष्ट केले.

उद्धव यांनी बुधवारी दिलेल्या मुलाखतीत वरील संकेत दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोघे भाऊ एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे.

मुलाखतीत बुधवारी उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे संकेत दिले.
आताच काहीही बोलणार नाही, राज यांचा मौनाचा सूर
उद्धव यांच्या प्रस्तावावर मुंबईतील सभेत राज यांची प्रतिक्रिया.
काँग्रेस-रा ष्‍ट्रवादीला फटका नाही
दोन्ही कुटुंबे एकत्र आल्यास आनंदच आहे. मात्र त्यांची विचारधारा भिन्न आहे. त्यांच्या एकत्र येण्याने रा ष्‍ट्र वादी वा काँग्रेसला फटका बसणार नाही. - नवाब मलिक, राष्‍ट्रवादी काँग्रेस