आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakckeray & Big B Amitabha Bacchan Today Share A Dias After 5 Years

अमिताभ बच्चन हे देवाने पाठविलेले महान कलाकार व्यक्तीमत्त्व- राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमिताभ बच्चन हे कोणी एका राज्याचे ब्रॅंड अॅम्बेसिडर नाहीत. ते संपूर्ण देशाचे ब्रॅंड अॅम्बेसिडर आहेत. बच्चन यांच्यासारखा महान कलाकार या देशात नाही आणि यापुढे तो होणे नाही, अशी स्तुतीसुमने उधळत राज ठाकरेंनी बच्चन यांच्यासोबत मागील काही दिवसापासून सुरु असलेला दुरावा मिटवला. गेल्या काही काळात जे झाले गंगेला अर्पण असे सांगत अमिताभ यांचे मार्गदर्शन, सहकार्य आम्हाला मिळत राहो अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केले.
बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे 5 वर्षानंतर सोमवारी रात्री एकाच व्यासपीठावर आले. मनसे चित्रपट सेनेचा 7 वा वर्धापनदिन व भारतीय सिनेमाच्या 100 वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी मनसेच्या चित्रपट सेनेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यावेळी चित्रपट क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना विमा कार्डाचे वाटप समारंभाचे प्रमुख पाहुणे अमिताभ बच्चन, राज ठाकरे व सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी महेश मांजरेकर, संजय नार्वेकर यांच्यासह चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज हजेरी लावली.
राज म्हणाले, अमिताभ बच्चन यांची मागील काळात दोन-तीनदा भेट झाली होती. बाळासाहेब आजारी असताना आम्ही भेटलो होतो. मागील महिन्यात सचिन तेंडुलकरच्या पार्टीत भेटलो होते. त्यावेळी त्यांचे आधी भाषण आणि नंतर माझे भाषण ठेवले गेले होते. त्यावेळी तेथे सचिन आणि बच्चन यांना म्हणालो होते की, सचिन, लतादीदी आणि बच्चन यांच्यासारखी माणसे पुरस्कराची धनी ठरतात तर आम्ही तिरस्कराते धनी ठरतो. पण ते जाऊ द्या, अमिताभ, सचिन, लतादीदी ही माणसे देवानेच आपल्यासाठी पाठविली आहेत. त्यांच्यासारखी महान व्यक्तिमत्त्वे तीच, असे सांगत ही सर्व लोक कोणा एका राज्याची नाहीत तर संपूर्ण देशाची आहेत. या लोकांवर जेवढा अलाहाबादमधील माणूस प्रेम तेवढाच मराठी माणूसही प्रेम करतो.
बच्चन म्हणाले, मनसे चित्रपट सेनेने अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. आम्ही कलाकार काही प्रमाणात या क्षेत्रात काम करणा-या आर्टिस्टची मदत करीत असतो पण एखाद्या संघटनेने पहिल्यांदाच एवढे मोठे काम केले आहे. त्यामुळे राज ठाकरे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. तसेच मला या कार्यक्रमाला बोलावले. मान-सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.