आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- मुंबईत वांद्रे- वरळी सीलिंकवर वेगाने गाडी चालवल्यामुळे झालेल्या वादातून वाहतूक शाखेच्या सचिन सुर्यवंशी या पीएसआयला मारहाण करुन चर्चेत आलेले व निलंबित असलेले आमदार क्षितीज ठाकूर व त्यांचे वडील हितेंद्र ठाकूर यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. तासभर झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पीएसआयला मारहाण केल्यानंतर क्षितीज ठाकूर, राम कदम यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केले होते. याचबरोबर ठाकूर व कदम यांना तीन दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले होते. तसेच पोलिसांवर लोकप्रतिनिधीसह कोणीही हात उचललेला खपवून घेणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला होता. मध्यतरी मुंबईत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी त्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला पोलिसांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच राज यांनी मनसेचे राम कदम या प्रकरणात थेट असतानाही पोलिसांची बाजू घेतली. तर, दुसरीकडे सरकारवर टीकास्त्र करीत आमदारांनाही गोंजारले होते. त्यामुळेच मूळ विषय व आपले म्हणणे मांडण्यासाठी क्षितीज ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे. याचबरोबर राम कदम यांना पक्षांतर्गत नाराजी भोवण्याची शक्यता होती. त्यामुळेच माझ्यासह कदम यांची या प्रकरणात काहीही चूक नसल्याचे राज यांना पटवून देण्याकरताच क्षितीज यांनी भेट घेतल्याचे सांगण्यात येते. यातून राम कदम यांना सहीसलामत वाचवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तसेच यामागे राम कदम यांच्या पक्षातंर्गत विरोधकांना बळ येऊ नये, यासाठी राम कदमांनीच ठाकूर यांच्या माध्यमांतून राज यांच्याकडे हा विषय पोचविल्याचे सांगण्यात येते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.