मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे बनावट
फेसबुक अकाउंट तयार करणा-या अज्ञात व्यक्तींविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राज यांचे खासगी सचिव सचिन मोरे यांनी लेखी स्वरूपात पोलिसांना तक्रार दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज यांच्या नावाने सोशल मीडिया साइट फेसबुकवर अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. बनावट अकाउंट तयार करणा-या व्यक्तींनी राज यांच्या नावाने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पठवल्या आहेत. त्यानंतर त्यांनी राज यांच्या नावाने चॅिटंग केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी खुद्द राज यांनी
आपले किंवा आपल्या कुटुंबीयांचे फेसबुक व इतर सोशल मीिडया साइटवर कोणतेही अकाउंट नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही काही उपद्रवी लोकांनी राज यांच्या नावाने फेसबुकवर अकाउंट उघडले. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.