आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakre Adopted Narendra Modi Marketing Style

मुख्यमंत्री बनण्यासाठी राज ठाकरे अवलंबणार मोदींची मार्केटींग स्टाईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)तर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करून निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांबरोबर विचारमंथन करून राज ठाकरे यांनी स्वतः यासंदर्भात रणनीती आखली आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर भाजपला मिळणा-या पाठिंब्यामध्ये वाढ झाली आहे. याच बाबीचा राज ठाकरेंवर प्रभाव पडला असून त्यांचेच अनुकरण करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालावरच या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
पुढे वाचा... विधानसभेसाठी राज यांचे लक्ष्य...