Home »Maharashtra »Mumbai» Raj Thakre As Amitabh Like Bol Bachchan - Nitesh Rane

'राज ठाकरे तर बोल बच्चन' ; व्यंगचित्रातून उडवली नितेश राणे यांनी खिल्ली

प्रतिनिधी | Feb 20, 2013, 14:18 PM IST

मुंबई - राज ठाकरे हे ‘बिग बी’ म्हणजेच बोल बच्चन आहेत’ अशी व्यंगचित्रे शिवाजी पार्क परिसरात लावून उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनी मनसे अध्यक्षांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मनसेच्या बालेकिल्ल्यात चर्चेला उत आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे चित्र त्वरित उतरवले. यावरून भविष्यात राज आणि राणे यांचे शाब्दिक युद्ध चांगलेच भडकण्याची चिन्हे आहेत.

2014 ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेऊन राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा आखला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातील खेड येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर जमिनी बळकावल्याचा आरोप केला होता. मालवणात जमिनी हडपल्या जात असल्याचे सांगून राज ठाकरे यांनी ही व्यक्ती नारायण राणे असावी असे म्हटले होते आणि जर ते नसतील तर त्यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हानही दिले होते.

Next Article

Recommended