आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाची समज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य निवडणूक आयोगावर टीका करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने शुक्रवारी लेखी पत्र पाठवून ‘आपल्या शब्दांवर आवर घाला,’ अशा शब्दांत समज दिली आहे.
ठाणे येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणा-या राज यांनी जिल्हा परिषद आणि महापालिकांचे निकाल एकाच दिवशी लावण्यात यावेत, अशी मागणी केली होती. तसेच राज्य निवडणूक आयोगावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही केला होता. त्याचप्रमाणे आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर केवळ दिलगिरी व्यक्त केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माफी दिल्याप्रकरणीही टीका केली होती. दरम्यान, आयोगाने शुक्रवारी राज यांना पत्र पाठवून आयोगावर टीका न करण्याची समज दिली. पत्रात म्हटले आहे की, राज यांनी आयोगावर टीका करू नये, आपल्या शब्दांवर आवर घालावा. निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे त्यावर टीका करणे म्हणजे घटनेवर टीका करण्यासारखे आहे.