आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांना केवळ दिलगिरीवर क्लीन चिट का? - राज ठाकरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलग दुसºया दिवशी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांना एका ओळीवर क्लीन चिट कशी दिली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे एका उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले होते. त्यावर भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आयोगाने अजित पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटिसीला दिलेल्या उत्तरात अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. केवळ माफी मागितल्याने हे प्रकरण संपल्याचे नीला सत्यनारायण यांनी जाहीर केले होते. मंगळवारीच निवडणूक आयोग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करून राज ठाकरे यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी घोषित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. बुधवारी पुन्हा आयोगावर टीका करताना ते म्हणाले की, चूक झाल्याबद्दल पवारांनी दिलगिरी व्यक्त करताच आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली. मीसुद्धा उद्या चूक करीन आणि दिलगिरी व्यक्त केली तर मलाही क्लीन चीट देणार का? अशा निवडणूक आयोगाची काय गरज आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही मनसेची दखलही घेत नाही : मधुकर पिचड
मनसेची दखलही आपल्याला घ्यावीशी वाटत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड यांनी राज ठाकरे यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देण्यास नकार दिला. निवडणूक आयोग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इशाºयावर चालतो, असे वक्तव्य राज यांनी मंगळवारी केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पिचड म्हणाले की, राज ठाकरे काही ऑथोरिटी आहेत का? आम्हाला आरोपांचे गांभीर्य वाटत नाही. बडबड करणाºयांना तोंड देणे आमचे काम नाही.