आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajani Patil, Moghe May In Race Of State Congress President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणिकरावांची उचलबांगडी?; रजनी पाटील, मोघेंचे नाव प्रदेशाध्यक्षपदी आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या 28 जूनला नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र समिक्षा समितीची बैठक होत असून, त्यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या स्थितीबाबत व आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा व रणनिती ठरण्याची शक्यता आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या जागी नवा प्रदेशाध्यपद नेमण्याचा विचार केला जाणार असल्याचे संकेत काँग्रेसमधून मिळत आहेत. ठाकरे यांच्या जागेवर आदिवासी नेते शिवाजीराव मोघे किंवा खासदार रजनी पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो मात्र, राष्ट्रवादीसोबत त्यांचे संबंध खराब असल्याने त्यांच्या नावावर गांभीर्याने विचार होण्याची शक्यता तशी कमीच आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला. अवघे दोन खासदार त्यांचे निवडून आले आहेत. आता तीन महिन्यांच्या तोंडावर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे अकार्यक्षमपणाचा ठपका असलेले प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी सोडल्या तर देशातील कोणत्याही राज्यात महिला प्रदेशाध्यक्ष नाही. त्यामुळे राज्यात महिलेला प्रदेशाध्यक्ष देण्याचा विचार होत आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधींच्या निकटवर्तीय खासदार रजनी पाटील यांच्या नावाचा विचार होत आहे. तसेच त्या मराठवाड्यातील असल्याने पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील योग्य समन्वय साधतील असे काही नेत्यांना वाटत आहे. दुसरीकडे, अनुभवी व काँग्रेसचे एकनिष्ठ आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे द्यावीत असे काहींना वाटत आहे. मोघे एक कुशल संघटक आहेत तसेच आपल्या शांत वृत्तीने काम करण्याच्या पद्धतीने लोकप्रिय आहेत. सर्वांना ते सोबत घेऊन जावू शकतात त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळू शकते.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाबाबत अशोक चव्हाण गट आग्रही आहे. मात्र, राष्ट्रवादीसोबत आगामी विधानसभा निवडणुका लढवायच्या झाल्यास विखे-पाटलांना संधी मिळणे कठिण दिसते आहे. विखे-पाटील आणि पवारांचे विळ्या-भोपळ्याचे नाते सा-या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे जागा-वाटपाचा तिढा सोडविताना तो न सुटता अधिक वाडेल असे काही नेत्यांना वाटते. काँग्रेसने जर स्वतंत्र निवडणुका लढवायच्या ठरविल्यास तर विखे-पाटलांकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाऊ शकते. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच निवडणूक लढवू इच्छित असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे रजनी पाटील किंवा मोघे यांच्याच नावाचा गांभीर्याने विचार होईल असे काँग्रेसच्या गोटातून संकेत मिळत आहेत.