आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव शुक्लांकडून 100 कोटींचा भूखंड परत, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील अंधेरी भागातील 100 कोटींचा भूखंड वाटपावरून वादाच्या भोव-यात सापडलेले केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला यांनी तो भूखंड राज्य सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शुक्ला यांच्या यांच्या स्वीय सहाय्यकाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नागपूर येथे विधानभवनात भेट घेऊन याबाबतचे पत्र दिले.
काँग्रेस सध्या अडचणीत आहे. त्यातच पक्षाच्या नेत्यांवर कोणतेही आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असा आदेश राहुल गांधी पक्षांतर्गत काढल्याने शुक्ला यांनी सेफ खेळी करीत आणखी अडचणीत येण्याआधी यातून मोकळे होण्याची निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण हा भूखंड परत घेणार की आणखी काही भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
पुढे वाचा, राजीव शुक्ला आणि भाजपमधील कोणत्या नेत्यांचे कौटुंबिक संबंध आहेत....