आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव शुक्लांचा 100 कोटींचा \'तो\' भूखंड सरकार दरबारी जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला यांच्या पत्नी अनुराधा प्रसाद यांच्या बी.ए.जी. फिल्मस् एज्युकेशन सोसायटीला राज्य सरकारने शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी अंधेरीतील आंबोली येथे दिलेला भूखंड सरकार दरबारी परत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
संबंधित भूखंड सरकारने परत घ्यावा या आशयाचे पत्र संस्थेने दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर अद्याप कारवाई केली नव्हती. याबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ही जागा सरकारने परत घेतली का, याची चौकशी केली असता त्यावर अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा भूखंड सात दिवसाच्या आत परत घेतला नाही तर उपोषण करू असा इशारा दिला होता. त्यानंतर जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ महसूल विभागाच्या सचिवांना तो भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, या जागेसाठी 2008 पासून खर्च झालेली 2 कोटी 19 लाख रूपये परत करावेत, अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.
संस्थेने मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी लिहलेल्या पत्रात म्हटले होते, की आपली संस्था देशात अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था चालविते. महाराष्ट्रात अशा प्रकारचे शैक्षणिक संकुल उभारण्‍यासाठी संस्थेने 2007 साली राज्य सरकारकडे भूखंड मिळण्यासाठी अर्ज केला होता. राज्य शासनाच्या धोरणानुसार शैक्षणिक उद्देशासाठी राखीव असलेला आंबोली येथील भूखंड क्रीडांगणासह वार्षिक भाडेतत्त्वावर 15 वर्षांसाठी लिजवर दिला होता. राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार संस्थेने शासनाकडे आवश्यक ती रक्कम भाड्यापोटी जमा केली आहे. तसेच याबाबतचा करार करून योग्य ते मुद्रांक शुल्कही शासनाला जमा केली होते. मात्र या भूखंडावर अतिक्रमण काढणे अशक्य असल्याने सरकारने हा भूखंड परत घ्यावा. त्यानंतरही हा भूखंड परत घेण्याबद्दलची कार्यवाही मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती. मात्र किरीट सोमय्यांनी आज आंदोलनाचा इशारा देताच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे.
मुंबईतील अंधेरी भागातील 100 कोटींचा भूखंड वाटप केल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला वादाच्या भोव-यात सापडले होते. त्यामुळे त्यांनी भूखंड राज्य सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शुक्ला यांच्या स्वीय सहाय्यकाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे जाऊन भेट घेतली होती, आणि पत्र दिले होते. काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. त्यातच निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या नेत्यांवर कोणतेही आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असा आदेश राहुल गांधी पक्षांतर्गत काढल्याने शुक्ला यांनी सेफ खेळी करीत आणखी अडचणीत येण्याआधीच यातून मोकळे होण्याची निर्णय घेतला आहे.
काय आहे नेमके हे प्रकरण, वाचा पुढे...