आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या जिल्हा जबाबदारीतून राजेंद्र दर्डांना डच्चू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीत पराभवाने खचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संघटनात्मक जबाबदारीचे जिल्हानिहाय वाटप केले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना जिल्हानिहाय जबाबदारीतून डावलले असून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे दोन जिल्हे देण्यात आले आहेत.
आगामी काळात संघटनात्मक बांधणी आंदाेलनाची जबाबदारी या नेत्यांवर असेल. निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षकार्यात सक्रीय नेत्यांनाच संघटनात्मक जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा: मधुकर चव्हाण (उस्मानाबाद), अब्दुल सत्तार (औरंगाबाद ), वर्षा गायकवाड (हिंगोली), डी. पी. सावंत (नांदेड), अमित देशमुख (लातूर), कल्याण काळे (बीड),बसवराज पाटील मुरूमकर (परभणी), तुकाराम रेंगे (जालना). सत्तार यांना जळगावचीही जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्र: पतंगराव कदम (सांगली), बाळासाहेब थोरात (नाशिक नगर), हर्षवर्धन पाटील (कोल्हापूर), शिवाजीराव मोघे (बुलडाणा), नितीन राऊत (नागपूर), नसीम खान (रायगड), सुरेश शेट्टी (वर्धा), पद्माकर वळवी (धुळे नंदुरबार), प्रा. वसंत पुरके (अमरावती), अनिस अहमद (गडचिरोली), रविशेठ पाटील (ठाणे), प्रकाश आवाडे (सोलापूर), विजय वडेट्टीवार (चंद्रपूर), राजेंद्र मुळक (भंडारा), सतेज पाटील (सातारा), राजेंद्र गावित (पालघर), रणजित कांबळे (वाशीम), गोपालदास अग्रवाल (गोंदिया), नितेश राणे (रत्नागिरी), हुस्नबानो खलिफे (सिंधुदुर्ग), जयकुमार गोरे (पुणे), डॉ. उल्हास पाटील (अकोला), गेव्ह आवारी (यवतमाळ) यांचा समावेश आहे.