आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेससाठी व्यावहारिक उपाय हवेत; एआयसीसी सदस्य चव्हाण यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या बळकटीसाठी कठोर पावले उचलून व्यावहारिक उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सदस्य राजीव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
जयपूर येथील चिंतन शिबिरात पक्षातील 30 टक्के पदे 45 वर्षांखालील नेत्यांना देण्याच्या प्रस्तावावर आश्चर्य व्यक्त करत चव्हाण म्हणाले की, 45 वर्षाखालील नेत्यांना पदे दिल्यामुळे पक्ष युवकांशी जोडला जाईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. 30 टक्केच का 50 टक्के पदे का दिली जाऊ नयेत. जे लोक वयाच्या बंधनाची भाषा करतात, त्यांच्याकडून युवकांच्या मूळ प्रश्नाकडे कानाडोळा केला जातो. त्यांचा युवकांशी पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. चांगले काम करणार्‍यांचा पक्षात गौरव झाला पाहिजे, असे कॉँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या सूचनेचे आपण स्वागत करतो. नेत्यांच्या कार्यक्षमेचे ऑडिट करण्याची वेळ आली आहे, असे चव्हाण म्हणाले.