आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावना दुखावल्यास लोक विरोध करतीलच; पद्मावती चित्रपटाच्या वादावर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकांच्या भावना दुखावल्यास ते विरोध करतीलच, असे वक्तव्य गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या विवादाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पत्रात म्हटले होते की, प्रेमात नकार मिळाल्यावर काही मुले आणि मुली चेहऱ्यावर अॅसिड फेकतात. ते कुठल्याही जाती अथवा धर्माचे असले तरी मला ते अलाउद्दीन खिलजीचे वंशज वाटतात. 
 
- एका मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले, समाजातील काही लोकांचे म्हणणे आहे की चित्रपट प्रर्दशित होऊ नये. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सॅन्सॉर बोर्डाने याला मंजूरी दिली आहे. परंतू आपण लोकांच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. जर कुणाच्या भावना दुखावत असतील तर ते नक्कीच आवाज उठवतील. भाजपच नव्हे तर अन्य पक्षाचे नेतेही हा चित्रपट प्रर्दशित होऊ नये असे म्हणत आहेत. 
 
कसा सुरु झाला पद्मावती चित्रपटाचा वाद?
- राजपूर करणी सेना या चित्रपटाला विरोध करत आहे. याची सुरुवात राजस्थानात चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच झाली. 
- राजपूत करणी सेनेचे म्हणणे आहे की, या चित्रपटात पद्मिनी आणि खिलजी यांच्या दरम्या्नचे प्रणयदृश्य दाखविण्यात आल्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे. राजपूत करणी सेनेने अनेक ठिकाणी निर्दशने केली आहेत आणि पुतळेही जाळले आहेत. 
- भाजपने म्हटले आहे की, हा चित्रपट क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावू शकतो. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी राजपूत समाजाच्या प्रतिनिधींना दाखवला पाहिजे. त्यामुळे चित्रपटाचे सुरळित प्रदर्शन होईल आणि तणाव निर्माण होणार नाही. 
 
चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे काय आहे म्हणणे
- पद्मावतीला विरोध केल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी म्हणाले की, या चित्रपटात असे काही नाही ज्यामुळे त्याला विरोध करावा.
- नुकतीच एका कलाकाराने पद्मावतीची रांगोळी काढली होती पण ती काही लोकांनी खराब केली. त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना टॅग करत ट्विट केले होते की या घटनांवर कारवाई झाली पाहिजे.
 
पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...