आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- खासदार राजू शेट्टी महायुतीत आल्याने राज्य सरकार सूडाचे राजकारण करत आहे. शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केल्यास महायुती रस्त्यावर उतरेल, असा इशारा सोमवारी महायुतीच्या नेत्यांनी दिला आहे.
2012 मध्ये उसाला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी संघटनेने आंदोलन केले होते. या आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसाचे रविवारी निधन झाले. राज्य सरकारने या मृत्यूबाबत शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांंवर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत शेट्टी यांना अटक झाल्यास राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले. स्वाभिमानी संघटना महायुतीसोबत आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे केवळ सूडबुद्धीने शेट्टी यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना अटक करण्याचा डाव रचला जात आहे. राष्ट्रवादी स्वार्थासाठी सूडाचे राजकारण करत आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यास व कार्यकर्त्यास हात लावला तर सहन केले जाणार नाही. सरकारने सूडाचे राजकारण केल्यास महायुती संघर्ष करेल, यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.